पुणे जिल्हा : हांडेवाडीत अज्ञाताने चार गाड्या पेटवल्या

लोणी काळभोर : ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने अज्ञात व्यक्तीने 4 चारचाकी गाड्या पेटवून दिल्याची घटना हांडेवाडी (ता. हवेली) येथील शेवाळवाडी फाटा परिसरातील नॅशनल स्क्रैप सेंटर दुकानाच्या समोर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी श्रीपाल रमणिकलाल शहा (रा. हांडेवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीपाल शहा यांचे हांडेवाडी येथील सर्व्हे नं 43/03 मध्ये नॅशनल स्क्रॅप सेंटर नावाचे दुकान आहे.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या समोर पार्क केलेल्या 2 गाड्यांना अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे नुकसान व्हावे या उद्देशाने ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने आग लावली. या आगीमध्ये आणखीन 2 गाड्याही जळाल्या. या आगीत 4 चारचाकी गाडयांचे सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.





