पुणे जिल्हा : रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण

गहू, हरभरा पीक हिरवेगार : बळीराजा समाधानी
चिंबळी – गेल्या काहि दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून थंडीचा कडाका वाढला असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा पीक हिरवेगार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
खेड तालुक्यातीच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरातील शेतकरी वर्गानी गेल्या एक महिन्यापूर्वी हिवाळी हंगामातील रब्बी पीक म्हणून टोकन पद्धतीने लावलेले गहू, हरभरा, लसूण पीक घेतले घेतले असून या पिकाला खत पाणी वेळेवर घालून औषध फवारणी केली.
गेल्या 15 दिवसांपासून हवामानात बदल होऊन थंडीचे वातावरण निर्माण झाले असल्याने पीके हिरवेगार झाले असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. खुरापणीचे कामे सुरू केली आहे;
परंतु या परिसरात शेतमजुरांची टंचाई जाणवत असल्याचे आदर्श सरपंच व प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब लोखंडे यांनी सांगितले असून शेतकरी वर्ग स्व:ता खुरपणीच्या कामात व्यस्त झाला आहे.





