पुणे जिल्हा : कारखाना गेला तरी जमिनी जाऊ देणार नाही

हरणेश्वर ऍग्रो सभासदांचे आजपासून बेमुदत उपोषण
पळसदेव : सुमारे 12 हजार शेतकऱ्यांना सभासदांच्या भवितव्य वाचवण्यासाठी हरणेश्वर ऍग्रो बचाव कृती समितीच्या वतीने उद्यापासून (मंगळवार) बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची लेखी माहिती समितीचे सचिव सखाराम खोत यांनी दिली. अवर्षणप्रवण क्षेत्रातील माळाच नंदनवन करू, असे स्वप्न दाखवून फुकटात जमिनी दिलेल्या येथील शेतकऱ्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.
गेल्या बारा वर्षांपासून धुपत असलेला कारखान्याचे भवितव्य स्पष्ट झाले आहे. कारखाना भंगारात गेला, आता किमान जमिनी तरी फुकटात जाऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवून हरणेश्वर ऍग्रो बचाव कृती समितीने संघर्ष करण्याचा मार्ग निवडला आहे.
त्यात कारखाना लिलाव प्रक्रियेत मोठे गौडबंगाल असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याशिवाय कामगारांचे पगार, गाळपास दिलेल्या बीट व उसाची बिले कोण देणार, हा मोठा सवाल आहे.
या सर्वांतून न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनांचे हत्यार उपसले आहे. या बाबत या निवेदन देण्यात आले आहे. यावर सचिव सखाराम खोत, रणजित पाटील, साहेबराव वायाळ यांच्या साह्य आहेत.





