Pune District : घोडेगावतील ज्येष्ठाचा जीबीएसमुळे मृत्यू

मंचर : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जीबीएसमुळे शुक्रवारी (दि. 4) मृत्यू झाला आहे. घोडेगाव येथे एका व्यक्तीला 28 मार्च 2025 पासून श्वसनाचा त्रास होता.
श्वसनाचा होत असल्याने त्या रुग्णाला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविल्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर गुरुवारी (दि. 3) त्यांना जीबीएस असल्याचा अहवाल आला होता.
दरम्यान, लक्षणे ही जीबीएसची असल्याने त्या दृष्टिकोनातूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णाला दमा रक्तदाबाचा आजार होता, गुडघे दुखत होते; मात्र उपचारा दरम्यानच या रुग्णाचा पुणे येथे मृत्यू झाला आहे.
आंबेगाव तालुक्यात जीबीएसचा रुग्ण आढळल्याने व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा जीबीएसचा रुग्ण घोडेगाव येथे ज्या ठिकाणी राहत होता. त्या भागाची आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण तपासणी करण्यात आली असून त्या भागातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.





