– जालिंदर कामठे हिवरेत शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप सासवड – राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेसारख्या कल्याणकारी योजना, तसेच वंचित व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले. हिवरे (ता. पुरंदर) येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, शिष्यवृत्ती वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमात कामठे बोलत होते. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानूकाका जगताप, एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, रमेश कुदळे, भैय्या खैरे, सचिन पठारे, शांताराम दळवी, रवी गायकवाड, मुख्याध्यापिका सुनीता रायडू, नंदू गायकवाड, अशोक दळवी, गुलाब गायकवाड, शांताराम गायकवाड आदी उपस्थित होते. कामठे म्हणाले की, पुरंदर तालुका लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे. येथील सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने सामाजिक भान ठेवणारे उपक्रम राबवले जातात, याचे कौतुक वाटते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड, प्रास्ताविक शब्बीर शेख यांनी तर विकास भोसले यांनी आभार मानले. जालिंदर कामठे हे सातत्याने समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून पोहोचतो. – संतोष जगताप, अध्यक्ष, एकनाथ काका प्रतिष्ठान