Pune District : विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण आवश्यक

– माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन
मंचर – राज्यात हिंदी विषयावरून गदारोळ माजला आहे. ग्रामीण भागातील अनेक मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. मात्र, मातृभाषेत घेतलेले शिक्षण हे विद्यार्थ्यांना विविध गोष्टींची आकलन होण्यासाठी महत्त्वाचे असते.असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार दि.२० रोजी केले.
मंचर येथील शिवगिरी कार्यालय येथे आंबेगाव तालुका प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी सभापती संजय केंगले, उपसभापती दत्तात्रय मेचकर, बाबाजी गाढव, विकास बाणखेले, भास्कर चासकर, संतोष लबडे, अभिजीत नाटे, शंकर गवारी, बाळासाहेब सैद, मीनाक्षी वळसे पाटील, सोपान सैद, बाळू साबळे, संतोष पोखरकर,
कान्होबा डोंगरे, सखाराम मुंजाळ, सुरेखा तोडकर, नंदकुमार चासकर, गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश बढे, महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम एड कृती समितीचे अध्यक्ष राजू जाधव,तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर,उदयकुमार लोंढे यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, शिक्षक व्यवस्था ही समाजातील मूलभूत व्यवस्था असून समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. समाज घडवण्याचे, आदर्श नागरिक घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. सुनील भेके यांनी सूत्रसंचालन केले. तुषार शिंदे यांनी आभार मानले.
आम्ही त्यांना काय सांगणार?
काही वर्षांपूर्वी शिक्षकांच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी, खुर्च्यांची फेकाफेकी अशा बातम्या ऐकल्या होत्या. पण आंबेगाव तालुक्यातील शिक्षक गुणवंत आहेत ते चांगल्या प्रकारे काम करतात.त्यामुळे त्यांना आम्ही काय सांगणार पण आता आम्ही धराधरी ठोकाठोकीपर्यंत गेलो आहे. असे म्हणत वळसे पाटलांनी विधिमंडळाबाहेर झालेल्या भांडणाबाबत वक्तव्य केले.





