पुणे जिल्हा: शिरूर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना टॅबचे वाटप

शिरूर – पंचायत समिती शिरूर अंतर्गत नियुक्त असलेल्या ग्रामरोजगार सेवकांना रोजगार हमीच्या कामासाठी शिरूर गटविकास अधिकारी महेश डोके, विस्तार अधिकारी पंचायत आर.आर राठोड, बी.आर गावडे यांच्या हस्ते टॅब वितरण करण्यात आले. यावेळी गटविकास आधिकारी महेश डोके यांनी वृक्ष लावगड व जलसंधारण या कामांवर भर देण्याच्या सुचना ग्रामरोजगार सेवक यांना दिल्या.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणारी सर्व कामे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येतात. सदर कामांचे जिओ टॅगिंग करणे, हजेरी नोंदविणे, मजुरांचे जमा देयक चेक करणे. तसेच ऑनलाइन संदर्भातील सर्व कामांना गती मिळण्यासाठी सदर टॅब उपयुक्त ठरणार आहेत.
रोजगार सेवक हा आपल्या ग्रामपंचायतमधील मुख्य प्रशासकीय घटक म्हणून काम करत या असताना रोजगार हमीच्या चालू व अर्धवट राहिलेल्या कामांचा पाठपुरावा करून रोजगार हमीतील कामांचा लाभ जास्तीत जास्त लाभधारकाला करून देत असतो. रोजगार सेवक अँड्रॉइड फोन वापरत नसल्यामुळे रोजगार हमीच्या कामाची माहिती अपलोड करताना अनेक अडचणी निर्माण होतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार सेवकांना टॅप वाटप करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कार्यक्रम आधिकारी सुधिर कुटे, तांत्रिक आधिकारी राजेंद्र कोकरे, महेंद्र नेवसे, डाटा एंट्री ऑपरेटर संतोष साळवे, किरण राठोड, लक्ष्मण मिरपगार,रोजगार सेवक राजू चव्हाण, सारीका थोरात, शितल नाणेकर, तृप्ती नवले, सुशांत टेमगिरे, अनिल चव्हाण, जयश्री सरोदे , सुहास गाजरे व तालुक्यातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





