पुणे जिल्हा : देशात, राज्यात हुकूमशाहीचा कारभार

जयंत पाटील : सासवड येथे घेतला पक्षाच्या कार्याचा आढावा
सासवड – देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. याचा भाग म्हणजे उल्हासनगर येथील सत्ताधारी आमदारांचा गोळीबार होय, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या व मित्र पक्षाच्या कामाचा आढावा, मागील मतदानाबाबत त्यांनी माहिती घेतली. तर यावेळी खासदार सुप्रिया सळे यांना कसे वातावरण राहील याबाबत माहिती घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी सासवड (ता पुरंदर) येथे शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांच्या कार्यालयाला जयंत पाटील यांनी भेट दिली,
त्यावेळी उल्हासनगर येथील भाजप आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार करून दहशत निर्माण केल्याबद्दल ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बबनभाऊ टकले, बंडूकाका जगताप, सयाजी वांढेकर, अॅड. कलाताई फडतरे आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यत सध्या सत्ताधारी मंडळींची गुंडागर्दी दहशत वाढत असून त्यांची पक्षीय यंत्रणा त्यांचे मागे खंबीरपणे उभी राहते आहे, पण पक्षाचे मागे आमदार उभे आहेत का हेच कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधात बोलणार्या लोकांना इडी, सीआयडी व इन्कम टॅक्स या प्रभावी हत्यारांचा दुरुपयोग करत असून पक्ष फोडण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
दोन गट पडल्यामुळे…
पुरंदरमधील राष्ट्रवादीची सध्याची काय परिस्थिती आहे. पक्षाची दोन गटात विभागणी झाल्यामुळे व अजित पवार गट सक्रिय झाला असल्याने पक्षात आव्हान उभे राहिले असल्याने व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने अंदाज घेण्यासाठी ते भिंताडे यांचे कार्यालयात काही वेळ होते. नंतर ते जेजुरी येथील हुतात्मा उमाजी नाईक यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी जेजुरीकडे मार्गस्थ झाले.





