Pune District: वाल्ह्यात जुलाब, उलट्यांची साथ

वाल्हे : मागील काही दिवसांपासून वाल्हे (ता. पुरंदर) येथे जुलाब, उलट्याची साथ सुरू असल्याने अनेकजण प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसेच खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. वाल्हे येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारून वाहणार्या ओढ्यावर सिद्धार्थनगर येथील तलाठी कार्यालया शेजारी बांधलेल्या बंधार्यात सांडपाणी साठवून त्यावर शेवाळ, गवत वाढले आहे.त्यामुळे बंधार्यातील पाणी दूषित झाले असून पाण्याची दुर्गंधी परिसरात पससत असून डासांची उत्पत्ती वाढत असल्याने गावात साथीचे आजार पसरले आहे.
गावाच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या ओढ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला पूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेल्याने गावातील दूषित पाणी पुलाजवळ असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत मिसळले असल्याने नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
वाल्हे गावचे ड्रेनेज लाईनचे पाणी याचा ओढ्यामध्ये सोडले असल्यामुळे ते पाणी बंधर्यात जाते.त्यामूळे बंधारा परिसरात असलेल्या विहिरी व बोरवेलमधील जलस्त्रोत दूषित झाले आहेत. तसेच घाणीचे साम्राज्य वाढत असल्याने व ओढ्यात काहीजण कचरा टाकत असल्याने डासांचे प्रमाण ही वाढले असल्यामुळे परिसरात साथीचे आजाराचे प्रमाण जास्त पसरत आहेत.
हा बंधारा हा छोटे लघु पाटबंधारे मालकीचे असून तो फोडून खराब पाणी काढून देणे ग्रामपंचायतीला शक्य नसल्याने,याबाबत जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर या बंधार्याला मध्यभागी तोडून त्याला ढापे बसवण्याचे नियोजन आहे. ढापे बसविल्याने दूषित पाणी झाल्यानंतर सोडता येईल. मात्र याबाबत लघू पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा. तसेच ग्रामस्थांनी पाणी उकळून, गार करून प्यावे.
– अतुल गायकवाड, सरपंचगावात तातडीने सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. रुग्णांना जास्त बाधा होऊ म्हणून यासाठी गावांतर्गत सर्व्हे करून प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. साथ आटोक्यात असून वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचारी रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. येथील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. लवकरच या पाण्याचा तपासणी अहवाल प्राप्त होईल.
– डॉ. प्रशांत आंधळे, वैद्यकीय अधिकारी, वाल्हे





