पुणे जिल्हा : मोकाट कुत्र्यांकडून शेतपिकांची नासधूस
Updated On:

चिंबळी, कुरुळीतील शेतकरी, नागरिक भयभीत
चिंबळी – चिंबळी, कुरूळी परिसरात मोकाट फिरणार्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून ते शेतपिकांची नासधुस करीत असून मॉर्निग वॉकला जाणार्यांच्या अंगावरही धाऊन जात असल्याने शेतकर्यांसह नागरिक भयभीत झाले आहे.
पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या नागरिकांवर मोकाट फिरणारी कुत्री अंगावर धाऊन जातात आहेत. तर रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा लसूण
तसेच नुकतीच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाची सकाळ, संध्याकाळ नासधूस करीत असल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाले असल्याने मोकाट फिरणार्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





