Pune District: जेजुरी गडावर रंगली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

जेजुरी : श्रीमार्तंड देवसंस्थान जेजुरी न्यासाकडून बुधवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऐतिहासिक शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे समूह शिल्पाच्या ठिकाणी महाराजांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मानवंदना देण्यात आली. तसेच श्री खंडोबा मंदिर गडकोटामध्ये शिवशंभु मर्दानी आखाडा, कोल्हापूर यांच्या शिवभक्तांनी मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण केले.
यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, मंगेश घोणे, अॅड. विश्वास पानसे, देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप व सुधीर गोडसे, पुजारी सेवेकरी वर्गाचे गणेश आगलावे, रवी जोशी, सुरेश उबाळे, महेश उबाळे, विठ्ठल सोनवणे, विक्रम माळवदकर, शैलेश राऊत आदी गावकरी, मानकरी उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त देवसंस्थान कडून मुख्य गाभार्यात फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच मंदिर गडकोटामध्ये व समूह शिल्पाच्या ठिकाणी देखील फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्व कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापक आशिष बाठे व अधिकारी सेवेकरी वर्गाने केले.




