पुणे जिल्हा : दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ

इंदापुरातील ओबीसी एल्गार महामेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा
इंदापूर – नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कुंटूर हल्ली नांदेड ते बंगळुरु राज्य मार्गावर आंदोलनाला हिंसक वळणामध्ये पोलीस अंमलदार जखमी, तर बीड जिल्ह्यात तीन पोलीस अधिकारी तीन अंमलदार पोलीस जखमी, हे सार बघून या राज्यात कोण अशांतता माजवत आहे? आम्ही कधी म्हणलो की कुरार्हा घेऊ; मात्र ते यवतमाळला म्हणतात आमच्याकडे तलवारी आहेत, कुरार्हाडी आहेत.
छगन भुजबळला 24 तारखेनंतर हिशोब करतो, तुला दाखवतो हे काय चालले आहे. आमच्या विरोध मराठा शाही नाही तर झुंडशाहीला आहे. जी दादागिरी चालली आहे.त्याला आमचा विरोध आहे. ही दादागिरी जर अशीच सुरू राहिली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
इंदापूर येथे ओबीसी एल्गार महामेळाव्यात मंत्री छगनराव भुजबळ ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश अण्णा शेडगे, माजी मंत्री महादेव जानकर, समीर भुजबळ, लक्ष्मणराव गायकवाड, आमदार गोपीचंद पडळकर, प्राध्यापक टी. पी. मुंडे, प्राध्यापक राजाराम पाटील, शिबिरभाई अन्सारी, लक्ष्मणराव हाके, कल्याणराव दळे, दौलत शितोळे, अॅड. कृष्णाजी यादव, पांडुरंग शिंद यांच्यासह लाखो ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामोशी समाज बांधवांच्या वतीने घोंगडी व कुर्हाड देऊन मंत्री भुजबळ यांचा सन्मान करण्यांत आला.
रात्रभर त्यांना परमिशन आहे का?
राज्यात अशांततेचे वातावरण पसरवले जात आहे. दोन जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. ते जर 15 दिवस फिरतात, सकाळपासून त्यांच्या मीटिंग, आपली मीटिंग रात्री 10 वाजता बंद होते; परंतु त्यांची रात्री 12, मध्यरात्री 2, रात्रभर त्यांना परमिशन आहे की नाही माहिती नाही. पोलीस देखील कारवाई करत नाहीत. जरंगे म्हणेल तो कायदा. कायदा फक्त तुम्हालाच आहे का? त्यांनी काही बोलले तरी चालते परंतु, आम्ही बोललो की राज्यात अशांतता पसरवण्याचे काम आम्ही करतोय, अशा अफवा उठवल्या जातात, असे भुजबळ यांनी नमूद केले.
सरकारच्या कामावर ओढले ताशेरे
राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही.आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? पोलीस जरांगे यांना फक्त चला म्हणाले, त्यावेळी जेवढे गच्चीवर दगड धोंडे होते. त्याचा मारा पोलिसांवर केला पोलीस जखमी झाले. महिला पोलिसांवर हात टाकण्यात आला नंतरच बचावासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला हे मी दोन महिने बोलतो आहे. कोणी बोलायला तयार नाही; परंतु शुक्रवारी (दि. 8) विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, जमाव हिंसक झाला. एक-दोन नाही तर 79 पोलीस अंमलदार जखमी झाले. मगच पोलिसांनी बचावात्मक मार्गासाठी लाठी चालवली यामध्ये 50 आंदोलक जखमी झाले ही बाजू जर त्याच वेळेस पुढे आली असती तर त्याला सहानभूती मिळाली नसती, अशीही सरकारच्या कामावर ताशोरे मंत्री छगन भुजबळ यांनी मारले.





