Pune District : श्रींच्या दर्शनासाठी नायगावात गर्दी; श्री सिद्धेश्वर महाराज, माता जोगेश्वरीची बांधली आकर्षक पूजा

नायगाव : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नायगाव येथे माघ पौर्णिमेनिमित्त भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. माघ पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कर्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला. ह.भ.प.सुनिल महाराज शिंदे यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी सुनील महाराज शिंदे यांचा देवस्थानचे विश्वस्त डॉ. दशरथ ठवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बी. बी. कड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल, नायगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप फडतरे,
लष्कराच्या लेप्टनंटपदी शिवानी चौंडकर हिची निवड झाल्याबद्दल शाळा इमारत बांधकामासाठी चांगदेव चौंडकर, त्रिंबक चौंडकर, रघुनाथ शेंडगे, मंदिरासाठी रामदास मेमाणे,मधुकर चौंडकर, रवींद्र बनकर यांनी देणगी दिल्याबद्दल, मुंबई पोलीसपदी सिद्धेश चौंडकर, साक्षी चौंडकर, प्रियंका चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.





