पुणे जिल्हा : स्वामी समर्थांचा देखावा पाहण्यासाठी गर्दी
Updated On:

मंचर : पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील गावठाणचा राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त भयाण कर्दळी वन आणि स्वामी समर्थ प्रकट दिन, असे एकूण दोन देखावे सादर करण्यात आले. देखावा पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
गावठाणचा राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या यावर्षी भयान कर्दळी वन आणि स्वामी समर्थ प्रकट दिन हा देखावा आयोजित आले असून देखाव्यात लहान-मोठ्या मुलांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत पात्रे साकारली आहे. देखावा पाहण्यासाठी भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
देखावा पाहण्यासाठी तालुक्यातून तसेच तालुक्याबाहेरील भाविकांची गर्दी होत आहे. दोन्ही देखावे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यामुळे मंडळांनी देखावा उभा करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले, असे मत मंडळाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले.





