पुणे जिल्हा : नारायणगावच्या विकासात जनतेचे योगदान -योगेश पाटे

नारायणगाव – नारायणगावच्या विकासात माझ्या एकट्याचे योगदान नसून गावातील सर्वांचे योगदान असल्याचे माजी सरपंच योगेश पाटे यांनी म्हटले आहे. जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामदैवत मुक्ताई मंदिरात बोलवलेल्या गाव बैठकीत ते बोलत होते.
यावेळी श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल प्रमुख संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, आरिफ आतार, संतोष वाजगे, अशोक पाटे, प्रल्हाद पाटे, विकास तोडकरी, दिलीप पाटे, अनिल दिवटे, सोपान खैरे, सुधीर खैरे, सुधीर जोरी, दादा खैरे, गिरीश मुनोत, आशिष कोठारी, सुनील दिवटे, शिरीष जठार, अजित वाजगे, अक्षय वाव्हळ ग्रामस्थ उपस्थित होते. योगेश पाटे म्हणाले की, निवडणूक लढवताना राजकीय संघर्ष मनात असू नये यासाठी सतत प्रयत्न केले.
ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना कोणाला त्रास होईल असे काम केले नाही व येथून पुढील काळातही त्रास देण्याची भूमिका नसेल. 2023 ते 2028 पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत आपण निवडून दिलेले सदस्य 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतील. आजपर्यंत गावचा विकास जनतेच्या माध्यमातूनच केला असून त्यासाठी खासदार अथवा आमदार निधी वापरला नाही. आशा बुचके यांनी ग्रामपंचायतीला मदत केली असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन हेमंत कोल्हे व ज्ञानेश्वर औटी यांनी आभार मानले.
“गावगाड्याचा ताबा गावातच राहिला पाहिजे. विकास करताना शेवटच्या घटकाचा विचार केला जाईल. सगळ्यांनाच वाटते आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे; परंतु 17 उमेदवारांची निवड करताना सगळ्यांना विश्वासात घेतले जाईल.” – संतोष खैरे, पॅनल प्रमुख





