कॅन्सरमुक्त अभियान जनजागृती मोहीम सुरू ः नागरी संघर्ष समितीचा उपक्रम इंदापूर – इंदापूर शहरात कॅन्सरचे बळी अनेक नागरिक जात असून, याचे कारण फक्त दूषित पाणी आहे. त्यामुळे इंदापूरचे दूषित पाणी कॅन्सरला निमंत्रण ठरत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॅन्सरमुक्त इंदापूर शहर करण्यासाठी तमाम इंदापूरकरांनी साथ द्यावी. असे आवाहन इंदापूर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णाजी ताटे यांनी केले आहे. यावेळी बोलताना इंदापूर नगर इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व संघर्ष समितीचे प्रमुख कृष्णाजी ताटे म्हणाले, जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी उजनी जलाशयाच्या दूषित पाण्याचा प्रश्नासंदर्भात एक अनोखे, पाऊल उचलले आहे. त्यांनी समक्ष उजनी जलाशयाला भेट दिली. वैज्ञानिकांच्या टीमचा अभ्यास केला. उजनी जलाशयाचे पाणी नमुने दिल्लीमध्ये अभ्यासासाठी याच प्रक्रियेच्या माध्यमातून पोहोचले आहेत. यासंदर्भात उजनी जलाशयाच्या शुद्ध पाण्यासाठी लढा उभारण्याचे धोरण निश्चित झाले आहे. हेच उजनी धरणाचे पाणी इंदापूर शहरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत. याच कॅन्सरच्या आजाराने अनेक जण बळी गेले आहेत. कधी नव्हते एवढे प्रमाण इंदापूर शहरात कॅन्सर रुग्णांचे झाले आहे. तरंगवाडी तलावातील इंदापूर नगरपालिकेने बंद केलेले निसर्गदत्त पाणी, इंदापूर शहरातील नागरिकांना पुन्हा पिण्यासाठी मिळणे अत्यावश्यक आहे. याच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनेसाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती जनजागृती मोहीम अभियान राबवत आहे. अशी माहिती संघर्ष समितीने दिली आहे. यावेळी हमीद अत्तार, संदिपान कडवळे, हाजी सलीमभाई बागवान, अशोक ननवरे, रघुनाथ खरवडे, हनुमंत बोंगाने, भारत बोराटे, दत्तात्रय माने, संतोष जामदार, चंद्रकांत देवकर, रविंद परबत, किसन पवार उपस्थित होते. जुन्या आडाचे पाणी पिण्यासाठी वापरा इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने दूषित पाण्याच्या अभ्यासासाठी शैलेंद्र पटेल यांना निमंत्रित केले होते. जलस्तोत्र अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी इंदापूर शहराला भेट दिली. कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत ही परिस्थिती मान्य केली. पुणेकरांचे पिंपरी चिंचवडचे मलमूत्र व कारखान्याचे दूषित रसायने मळी यामुळे, उजनीचे पाणी दूषित होत आहे. याला पर्याय शोधत असताना ते इंदापूर शहरात विशेषता जुन्या गावठाण हद्दीत मध्ये फिरले. तेव्हा त्यांना असे लक्षात आले की, गावठाण हद्दीमध्ये जुने आडांचे प्रमाण घरोघरी आहे. तेव्हा त्यांनी मागणी केली आडांचे पाणी तपासणीसाठी घ्यावे. डीपी योग्य असल्यास पुनर्जीवन करून पुन्हा या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलस्तोत्र अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी केले.