Pune District : निमगाव केतकीत दोन गटांत हाणामारी
Updated On:

इंदापूर : निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून शुक्रवारी (इ. 14) झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जय कुदळे, दिनेश शेंडे, दादा भोंग, सुरज पिसे व ओमकार राऊत (सर्व रा.निमगाव केतकी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर शंकर भीमराव भोंग (वय 37 रा.निमगाव केतकी ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
तर दादासो मधुकर भोंग (वय 27 वर्षे, व्यवसाय शेती रा.निमगाव केतकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर भोंग, स्वप्नील भोंग, शक्ती बारवकर, स्वप्नील बारवकर, अमोल भोंग, आशुतोष भोंग (सर्व रा.निमगाव केतकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.





