पुणे जिल्हा : महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण

भैरवनाथवाडी येथे तीन दिवसापासून वीज खंडीत
बारामती – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बारामती तालुक्यातील मेडद हद्दीतील, भैरवनाथवाडी येथे गेले तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. मात्र अद्याप येथील भागात लाईट आली नाही. महावितरण कंपनीचे अभियंता, अधिकारी मात्र नुस्ती बघायची भूमिका घेत आहे. त्यामुळे महावितरणाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
तीन दिवसांपासून या भागातील लाईट गेली आहे, मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नाही. एन पावसाळ्यात दिवस, रात्रभर लाईट गेल्यामुळे लहान मुले तसेच जेष्ठ,वृद्ध नागरिकांची ताळंबर होत आहे. विशेष म्हणजे भैरवनाथवाडी येथे मोठी लोकवस्ती असताना देखील येथे शेतीपंप आधारित नागरीकांच्या घरामध्ये विद्युत कनेक्शन देले आहे.
शेतीपंप आधारित विद्युत कनेक्शन असल्यामुळे येथे दररोज चार चार तास विद्युत पुरवठा खंडित होतो. खंडित वीजपुरवठा होऊ नये म्हणून गावठाण मधून विद्युत कनेक्शन द्यावे, यासाठी येथील नागरिकांनी महावितरण यांच्याशी पत्र व्यवहार केला. तरी अद्याप देखील महावितरण कंपनीने याची दखल घेतली नाही.लवकरात लवकर डीपी मंजूर करा अन्यथा ऊर्जा भवन येथे आंदोलन करू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
शेतीपंप आधारित नागरीकांच्या घरामध्ये विद्युत कनेक्शन असल्यामुळे येथील विद्युत पुरवठा सतत खंडीत होतो. वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून आम्ही गावठाण मधून विद्युत कनेक्शन डीपी मिळावा यासाठी महावितरणशी ३० मार्च रोजी पत्र व्यवहार केला होता. मात्र अद्याप ही येथे गावठाण मधून विद्युत कनेक्शन मिळाले नाही ही मोठी शोकांतिका आहे . लवकरात लवकर डीपी मंजूर करा अन्यथा ऊर्जा भवन येथे आंदोलन करू
– सुरज देवकाते, नागरिक
गावठाण मधून विद्युत कनेक्शन देण्यासाठी डीपी मंजूर करण्यासाठी आमच्याकडुन ८० टक्के कामकाज झाले आहे.. आचारसंहितेमुळे प्रशासकीय मान्यता राहिलेली आहे. मान्यता मिळाली की कामकाज लगेच सुरू करू.
– मोहन सुळ, उपकार्यकारी अभियंता





