चाकण : चाकण औद्योगिक वसाहतमधील कंपन्यांसह परिसरातील नागरिकांच्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसीकडे कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने हा कचरा राजरोसपणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने रस्त्यांच्या कडेला डंपिंग एरिया होऊन औद्योगिक वसाहतीचे विद्रूपीकरण होऊन कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाकण औद्योगिक वसाहत महत्त्वाची औद्योगिक वसाहत मानली जाते.पाच हजारांवर छोट्या-मोठ्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. सुमारे दोन लाखांवर कामगार वर्ग येथे आहे. मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाइल कंपन्या आहेत. दुचाकी, चारचाकीसह इतर अवजड वाहने, अर्थमूव्हर्स मशिनरी आदी बनविल्या जातात. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना सुट्टे पार्ट व इतर साहित्य पुरवणार्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या येथे आहेत. कंपन्यांत कामगार पुरविणारे ठेकेदार व इतर साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.मात्र कचरा प्रकल्प नसल्याने कचरा टाकायचा कोठे, हा प्रश्न कंपन्यांना भेडसावतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर कचर्याचे ढीग दिसतात. कचरा औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांचा आणि व्यवसायिकांसह रहिवाशांचा आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा रस्त्यावर एमआयडीसीमधील बहुतांश कंपन्या आणि व्यावसायिक रात्रीच्या वेळेस रस्त्याच्याकडेला कचरा टाकत आहे.यामुळे रस्त्याच्या कडेला कचर्याचे मोठे ढीग साचल्याचे पहायला मिळत आहेत.या कचर्यात कोंबड्यांची पिसे, प्लॅस्टिकच्या पिशव्या,बाटल्या, कँटीनमधील उरलेले खाद्यपदार्थ, भाजी बाजारामधील उरलेला भाजीपाला, जुने बांधकामाचा राडारोडा, सलूनमधील केस यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहे.कचरा उचलला जात नसल्याने तो कुजत असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील एचपी चौक ते खालुंब्रे – हुंडाई कंपनी दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा कचर्याचे अक्षरशः ढीग लागेल आहेत.यामुळे औद्योगिक वसाहत विद्रुपीकरण तर झालेच आहे.शिवाय आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.एमआयडीसी महसूल गोळा करून ही चांगल्या सुविधा उपलब्ध करू शकत नाही. – सुरेश पिंगळे-देशमुख, अध्यक्ष, सायली फॅसिलिटी, वासुली कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी एमआयडीसीकडे तितकासा निधी उपलब्ध नाही. याबाबत लोकप्रतिनिधींकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. संबंधित रस्त्यावरील कचरा लवकर उचलला जाईल. – सतीश चौंडेकर, कार्यकारी अभियंता, चाकण एमआयडीसी