Pune District : सहकार बचाव पॅनलचे उमेदवार जाहीर

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून गुरु- शिष्य ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे व माजी चेअरमन रंजन तावरे यांनी उमेदवार जाहीर केले. दरम्यान, गेली पाच वर्षांत चुकीच्या कारभारामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप यावेळी चंद्रराव तावरे यांनी केला.
रंजन तावरे म्हणाले की, सहकार बचाव पॅनल हा शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी केलेला पॅनल आहे. शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर देण्यासाठी, कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी व नवीन उद्योगधंदे उभारणीसाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे तवरे यांनी यावेळी स्पष्ट केले. कारखान्याचे मालक न होता सेवक म्हणून काम करणारे सर्व उमेदवार आहेत. सभासदांचा अण्णा काका या जोडीवर विश्वास आहे. त्यामुळे आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शुक्रवार (दि.१३) सकाळी नऊ वाजता नीरा वागज येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही रंजन तावरे यांनी स्पष्ट केले.
माळेगाव गट क्रमांक एक-
रंजनकुमार शंकरराव तावरे
संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे
रमेश शंकरराव गोफणे
पणदरे गट क्रमांक दोन-
सत्यजित संभाजी जगताप
रणजीत शिवाजीराव जगताप
रोहन रवींद्र कोकरे
सांगवी गट क्रमांक तीन-
चंद्रराव कृष्णराव तावरे
रणजीत वीरसेन खलाटे
संजय बाबुराव खलाटे
खांडज शिरवली गट क्रमांक चार-
मेघशाम विलास पोंदकुले
विलास नारायण सस्ते
नीरावागज गट क्रमांक पाच
राजेश सोपान देवकाते
केशव तात्यासो देवकाते
बारामती गट क्रमांक सहा
गुलाबराव बाजीराव गावडे
वीरसिंह विजयसिंह गवारे
ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था
भालचंद्र बापूराव देवकाते
महिला प्रतिनिधी
राजश्री बापूराव कोकरे
सुमन तुळशीराम गावडे
अनुसूचित जाती जमाती
बापूराव आप्पा गायकवाड
इतर मागास प्रवर्ग
रामचंद्र कोंडीबा नाळे
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
सूर्याजी तात्यासाहेब देवकाते.





