Pune District : इंदापुरात 35 बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोझर

नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे
इंदापूर – इंदापूर पोलिसांनी 35 बुलेट गाड्या ताब्यात घेऊन त्याचे सायलेन्सर काढून, बुलडोझर या काढलेल्या सायलेन्सरवर फिरवण्यात आला आहे, अशी माहिती बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी इंदापूर येथे पत्रकारांना दिली.
डॉ. राठोड म्हणाले की, तरुणाई मोठमोठ्या बुलेट गाड्यांचा आवाज करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे.
एक जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान नो पार्किंगचे पोलिसांनी 156 केसेस, ट्रिपल शीट 11 केसेस, सायलेन्सर बदलण्याच्या 65 केसेस, काळ्या काचेच्या 55 केसेस, नंबर प्लेट नसलेल्या चाळीस केसेस इंदापूर पोलिसांनी केलेले आहेत.
इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी अशा पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवणार असाल,यानंतर देखील कारवाई आम्ही कठोर करणार आहोत.





