शिरूर येथे दिव्यांग महिलांसाठी हळदीकुंकू सविंदणे – शरीर हीच खरी संपत्ती आहे, माणसाच्या जन्माच्या वेळेस सर्व जण हसत असतात फक्त ऐकटे बाळ रडत असते, पण आपण असे कर्म करावेत की आपण जाताना सर्व दुनिया रडत असेल पण आपण हसत जाऊ. आलेला प्रत्येक दिवस सकारात्मक कसा जगावा तसेच भविष्य व भूतकाळ विसरून फक्त वर्तमानात जगावे, असे प्रतिपादन शकुंतला दिदी यांनी केले. शिरूर तालुक्यातील नावाजलेली व तळागळातील गरीब महिलंसाठी काम करणार्या वेल्फेअर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष दिपाली शेळके व सचिव नम्रता गवारे या कायम नाविन्यपूर्व उपक्रम घेत असतात. वेल्फेअर फाऊंडेशनने असाच आगळा वेगळा हळदी कुंकू कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमात दिव्यांग महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात विधवा महिलांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अनेक दिव्यांग महिला, ऐकल महिला व विधवा महिला उपस्थित होत्या. या कार्क्रमाअंतर्गत स्नेहल बेडगर यांनी दिव्यांग बांधवांसाठी वॉकर व इतर साहित्य वाटप केले, त्यावेळी दिदी बोलत होत्या. यावेळी आकांक्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राणी चोर, ,शोभना पाचंगे, सुरेखा भोस ,सुनिता डोंगरे, मनीषा वाळुंज, रेणुका मल्लाव, ज्योती गजने श्रद्धा कांबळे सविता जगदाळे स्नेहल बोडघर या आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार वेल्फेअर फाउंडेशनच्या नम्रता गवारे यांनी मानले . विविध कामात बिझी ठेवले तर… स्वतःला विविध कामात बिझी ठेवले तर शरीराबरोबर आर्थिक बाजू बळकट होत असते, आपल्यातील व्यंग बाजूला ठेऊन आज सर्व जण येथे आलात हा खूप मोठा अभिमान आहे व जीवन जगण्यासाठी ऊर्जा आहे, असे प्रतिपादन शोभना पाचांगे यांनी केले.