विंझर : केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशन वेल्हे आणि केमिस्ट असोशिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय औषध विक्रेता महासंघ व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियनचे अध्यक्ष माजी आमदार जगनाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त वेल्हेत भव्य रक्तदान शिबिर स्वयंभू मेंगाईमाता मंदिर, वेल्हे येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचा शुभारंभ देवास्थान ट्रस्टचे सचिव विलास पांगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णा देशमाने, माजी सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच विकास गायखे, सुनील राजीवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ओम ब्लड बँक पुणे डॉ ईश्वर नांदे आणि त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य शिबिराला लाभले.
याप्रसंगी वेल्हेचे सरपंच स्मिता खुळे, ग्रामीण रुग्णालय वेल्हे डॉ. चंद्रकांत भोईटे, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. राहुल बोरसे, राजगड कारखाना संचालक संदीप नगिने, ऋषिकेश जाधव इ मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी केमिस्ट असोशियन ऑफ पुणे डीस्ट्रीकचे संचालक आकाश जाधव यांनी प्रास्ताविक व आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच वेल्हे तालुका अध्यक्ष संतोष शेंडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशन वेल्हेचे सदस्य ऋषिकेश कांबळे, विशाल नगिने, निलेश कुलकर्णी, पूजा शेंडकर व प्रशांत कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.