Pune District : खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वडापुरी-अवसरी रस्त्याचे भूमिपूजन

वडापुरी : इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावात वडापुरी ते अवसरी या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 3 कोटी 88 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या वडापुरी-अवसरी हा रस्ता दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून मागणी होत होती या रस्त्याच्या कामाला निधी प्राप्त झाल्याने या भागातील नागरिकांना दळणवळणात सुलभता येणार आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सागर मिसाळ, अशोक घोगरे, अमोल भिसे, हनुमंत जगताप, जनार्धन देवकर सर, महेश शिर्के, अमोल चंदनशिवे, दादासाहेब तोबरे, बाबूराव शिर्के, तानाजी पिंगळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चंदनशिवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





