पुणे जिल्हा : भानोबा देवाची पालखी बोटीतून मार्गस्थ

तळेगाव ढमढेरे – श्रीक्षेत्र कोयाळी (ता. खेड) या ठिकाणी भानोबा देवाचा उत्सव झाल्यानंतर भानोबा देवाची पालखी तळेगाव ढमढेरे येथे सकाळी ९ वाजता भिमाशेत ढमढेरे वस्ती येथे संभाजी दिनकर ढमढेरे यांच्या घरी विसाव्याठी पालखी थांबली होती. भानोबा देवाच्या आरतीनंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन तासांच्या विश्रांतीनंतर देवाची पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. यावेळी भाविकांनी पालखीच्या समोर लोटांगण घेत देवाचे चरणस्पर्श करून घेतले.
श्रीक्षेत्र कोयाळी (ता. खेड) या ठिकाणी भानोबा देवाचा उत्सव झाल्यानंतर भानोबा देवाची पालखी आपल्या आजोळी कुसेगाव (ता. दौंड) येथे जाण्यासाठी कोयाळी गावातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला. रात्री कोयाळी जवळच भिवरेवाडी येथे देवाची पालखी मुक्कामी विसावली. यावेळी अल्पकाळ विसावा घेऊन रात्रीच १.३० वाजता पालखी तळेगाव ढमढेरेकडे मार्गस्थ झाली.
ढमढेरे यांच्या घरी विसाव्याठी पालखी थांबली होती. यावेळी माजी चेअरमन संजय ढमढेरे, संचालक बाळासाहेब ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे, दिलीप ढमढेरे, दत्तात्रय ढमढेरे, खरेदी- विक्री संघाचे संचालक शहाजी ढमढेरे, डॉ. सुयोग ढमढेरे, अक्षय ढमढेरे, अनिल ढमढेरे, प्रकाश ढमढेरे, संदीप ढमढेरे, कुसेगावचे गोरख कोळेकर, संतोष शितोळे, निलेश शितोळे, शरद शितोळे, महेश शितोळे, दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुसेगावला २७ पासून यात्रा
भिमाशेत माळी वस्तीवरून भीमानदीच्या पात्रातून बोटीचा प्रवास करून पालखी सोहळा शिरूर तालुक्यातून हवेली तालक्यात प्रवेश करून न्हावी सांडसमार्गे कुसेगावकडे मार्गस्थ झाली. यावेळी देवाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. रविवार (दि.१७) देव कुसेगावला पोहोचणार असून बुधवार (दि.२७) व गुरुवार (दि.२८) रोजी कुसेगाव येथे भानोबा देवाची मोठी यात्रा होणार असल्याचे कुसेगावकरांच्या वतीने सांगण्यात आले.





