Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

पुणे : मागील चार वर्षांपूर्वी रखडलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची लेखनिक पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. २०२१ मध्ये ३५६ लेखनिक पदासाठी बॅंकेने अर्ज मागविले होते. त्यावेळी तब्बल ३२ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
ज्या टप्यावर ही प्रक्रिया स्थगित काण्यात आली होती, तेथून पुढे ही प्रक्रिया आता राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या लेखनिक पदासाठी पूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते तेच उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. उमेदवारांना नव्याने या पदासाठी अर्ज करता येणार नाही.
जिल्हा बँकेच्या लेखनिक पदाच्या सरळसेवा भरतीसाठी ७आॉगस्ट ते १७ आॉगस्ट २०२१ मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. दरम्यान, राज्य शासनाने एक निर्णय प्रसिध्द करत सहकार क्षेत्रातील बॅंकांमधील कर्मचाऱ्यांची भरती प्र्किया राबविताना पॅनेलवरील संस्थांच्या मार्फतच ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश काढले होते.
त्यानंतर एका विशिष्ट संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबविण्याचा संचालक मंडळांचा हट्ट होता. त्यामुळे बॅंकेने ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बॅंकेने सहकार विभागाकडे मार्गदर्शन मागविले. त्यावेळी सहकार विभागानेही शासनाने नियुक्त केलेल्या पॅनेलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी, अशी सूचना केली. या सर्व प्रक्रियेत चार वर्षांचा कालावधी गेला.
ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली होती. त्या पुढील टप्प्यांपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठीचे निवेदन बॅंकेने संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा बॅंकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.




