Pune District : कर्जमाफीसाठी बळीराजा आक्रमक

आळेफाटा येथे चक्का जाम आंदोलन : सरकारला घोषणेचा विसर
राजुरी – निवडणुकीपूर्वी या राज्य सरकारने घोषणा केली. शेतकर्यांचे सरसकट कर्जमाफी करू; मात्र आता राज्य सरकार उद्योजकांचे कर्ज माफ करते मग शेतकर्यांचे कर्ज का माफ करत नाही ते झालेच पाहिजे; अन्यथा भविष्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केली.
प्रहार जनशक्ती पक्ष जुन्नर तालुका व प्रहार अपंग क्रांती संघटना व शेतकरी आदोलन संघटना व राधेश्याम दिव्यांग संघटना जुन्नर तसेच माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या आदेशानुसार आळेफाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे, मच्छिंद्र थोरात,संजय भुजबळ, राजेंद्र आल्हाट, राहुल मुसळे, सुनील जंगम, गोरक्ष नरवीर, अनिल शेटे, सचिन वाव्हळ, गोरक्ष मातेले, अजिज पठाण, अनंत हाडवले, ताहोर आत्तार, कायदेशीर सल्लागार नंदा खोमणे, जमिला शेख, मंगल जाधव, माहिती सल्लागार गोविंद कुतळ, प्रहार अपंग संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष मंगल गांजवे, इमराज पठाण, सुदर्शन शिंदे दिगंबर झिंझाड, मच्छिंद्र शिंदे, नितीन वायदंडे, गणेश शेटे, अंकुश तळेकर,रचना वाळुंज, महेश सोमोशी व दिव्यांग मुकबधीर शेतकरी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक चव्हाण म्हणाले की, विधीमंडळात अधिवेशन सुरू असताना कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळत बसल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे, त्यामुळे राज्य सरकारने कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. तसेच यावेळी शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, दिव्यांग लोकांना घरकुल मिळालेच पाहिजे तसेच दिव्यांग लोकांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे, पेरणीचा व कापणीचा खर्च एमआरजीएस अंतर्गत करण्यात यावा,
शेतमालाच्या हमीभावावर 20 टक्के अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, संघटनेच्या वतीने आळेफाटा पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, वडगाव आनंदचे मंडलाधिकारी दादाभाऊ काळे यांना निवेदन देण्यात आले.





