पुणे जिल्हा : चंद्र, सूर्य असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही

– सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिपादन
मंचर – लोकसभेमध्ये आपली थोडीशी दिशाभूल केली गेली. कोणीही काही सांगितल तरी हा चद्रं व हा सूर्य, असेपर्यंत आरक्षण बदलले जाणार नाही. आदिवासी भागातील आदिवासी संस्था या चांगले काम करत आहेत, असे प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील तळेघर व जांभोरी आदिवासी विकास संस्थेच्या हिरडा खरेदी केद्रांच्या उद्घाटनप्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पूर्वा वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, मारुती लोहकरे, माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, नदंकुमार सोनवले, हनुमतं इष्टे, संरपंच कविता इष्टे, शामराव बांबळे, प्रांत अधिकारी गोविंद शिदे, विशेष अधिकारी सारगं कोडोलकर, सहाय्यक निंबधक विठ्ठल सूर्यवंशी, तहसीलदार संजय नागटिळक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले गेली ३५ वर्षे तुम्हीं मला ओळखता १९९० सालापासुन येथील रस्ते, शासकीय योजना, आरोग्याच्या दृष्टीने सुविधा, शिक्षणासाठी सुसज्ज आश्रमशाळा व एक इंग्रजी माध्यमाची शाळा, वसतीगृह या आशा अनेक गोष्टी आपल्या गरजे नुसार केल्या आहेत. आपला भाग चांगला व स्वच्छ ठेवला तर पर्यटक येतील.
त्यामुळे पर्यटनाला चालणा मिळून रोजगार उपलब्ध होईल. पाण्यासाठी आपल्याच परिसरात तेरुंगन, कोढवळ, आसाणे, गोहे, जांभोरी, चिखली परिसरात छोटे-मोठे बंधारे निर्माण केले. यात आदिवासी भागातील हिरडा उत्पन्नास योग्यभावासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तोही प्रश्न मार्गी लागेल. २०१९-२० मधील हिरडा नुकसान भरपाई ही खासबाब म्हणून मंजूर करुन ती वाटपही शेतकऱ्यानां झाली आहे.





