Pune District : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा इंदापुरात वर्धापन दिन

इंदापूर : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा दुसरा वर्धापन दिन व पक्षाचे संस्थापक संजय सोनवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमाद्वारे इंदापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी इंदापूर नगर परिषदेचे माजी उपरागराध्यक्ष अरविंद वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गुरुकुल संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ, आनंददादा चंदनशिवे, माऊली वाघमोडे, संग्राम सोनवणे, पांडुरंग मारकड, दिलीप मारकड, सोमनाथ धोत्रे, सुधीर मखरे, बाळासाहेब सरवदे, हनुमंत कोकाटे, विकास गायकवाड, लखन भंडारे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे हे गोरगरिबांच्या जीवाला जीव देणारे, हाकेला धावणारे, आणि प्रत्येक अडचणीला लोकांच्या धावून जाणारा दुःखात मदत करणारा कोणता कार्यकर्ता असेल तर तो संजय सोनवणे याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. असे गौरवोद्गार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.





