सानेगुरुजी कथामालेचे बाळासाहेब कानडे गुरुजी यांचे प्रतिपादन मंचर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या फक्त माळव्याच्या राणी नव्हत्या तर आदर्शवत राज्यव्यवस्थेच्या विचारधारेचं प्रतीक होत्या. त्यांचं सुशासन भारतीय राज्यकर्त्यांसाठी आजही दिशादर्शक आहे,असे प्रतिपादन सानेगुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी यांनी शनिवार, दि.३१ रोजी केले. ज्ञानलक्ष्मी कळंब (ता.आंबेगाव) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब दराडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.याप्रसंगी आंबेगाव शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती रवींद्र थोरात,पदवीधर शिक्षक सुनील कुऱ्हाडे, कुबेर क्लासेसच्या प्रा.सुनीता कानडे, ऊर्जा आयआयटीचे प्रा.राहुल देशमुख, निकिता देवढेकर, प्रा. समीक्षा देशमुख, प्रगती देवढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने सायली गायकवाड (महाराष्ट्र) आणि अजय देवढेकर (गुजरात) या उच्चशिक्षित नवविवाहित दांपत्याचा भारतीय संविधान प्रस्ताविका देऊन विशेष सन्मान करण्यात आला. केंद्रप्रमुख मनोहर सांगळे यांनी चांडोली बुद्रुक केंद्रात जबाबदारीने प्रशासन करत उत्तम शैक्षणिक कार्य करून केंद्राचा लौकिक वृद्धिंगत केल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची प्रतिमा देऊन गौरव केला. ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे यांनी प्रास्ताविक व गुणवंत पदवीधर शिक्षक विकास कानडे यांनी सूत्रसंचालन केले. आदर्श शिक्षक संतोष कानडे यांनी आभार मानले.