Pune District : संगीता आधवडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
Updated On:

विंझर : राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळ्यामध्ये वेल्हे (ता. राजगड) तालुक्यातील लाशिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता नितीन आधवडे यांना आदर्श सरपंच म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमामधे उपआयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे नितीन माने, चेअरमन एआरआय ग्रुप ऑफ इंडस्ट्री, ॲड. श्रीकांत ठाकूर इ प्रमुख मान्यवर तसेच सामाजिक, राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातून आलेले अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या संपूर्ण पुरस्कार वितरण सोळ्याचे आयोजन नालंदा ऑर्गनायजेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.





