पुणे जिल्हा : काटेवाडीत रंगले मेंढ्यांचे रिंगण

Updated On:

गोकुळ टांकसाळे
काटेवाडी –
जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी येथे आली असता येथील बस स्थानकासमोर पारंपरिक पद्धतीने मेंढ्यांचे गोल रिंगण करण्यात आले. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी व ग्रामस्थांनी हा सोहळा डोळे भरून पाहिला.

श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोमवार (दि. 19) सकाळी साडेबारा वाजता पोचली असता या ठिकाणी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार व उद्योजक रणजीत पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग कचरे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, अनिल काटे, जितेंद्र काटे, शितल काटे, दत्तात्रय काटे, प्रशांत काटे, राहुल काटे, आधी उपस्थित होते.

काटेवाडी या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा संपल्यानंतर बस स्थानका जवळ आल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पारंपरिक पद्धतीने मेंढ्यांचे रिंगण पार पडले. काटेवाडी गावातील मासाळ, केसकर, हाके, काळे, महानवर या धनगर समाजाच्या मेंढ्यांचा मान पालखीला वर्षानुवर्षे असल्याने पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले.

यावेळी शेकडो वारकऱ्यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी बारामती ग्रामीण व शहर पोलीस अधिकारी व पोलिसांच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिशय भक्तीमय वातावरणामध्ये वातावरणात या ठिकाण मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखीने इंदापूर तालुक्‍याकडे प्रस्थान केले.

काटेवाडीत का घातले जाते मेंढ्यांचे रिंगण?
मेंढ्यांचे रिंगण संत तुकाराम महाराजांच्या पालखीला गेली कित्येक वर्षे घातले जाते. या मागे एक अनोखी कहाणी पाहायला मिळते. एकदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीत आगमन झालं होतं. त्यावेळेस काटेवाडी आणि आसपासच्या परिसरात मेंढ्यांवर एका विशिष्ट रोगाची साथ पसरली होती. त्या साथीत अनेकांच्या मेंढ्या मरण पावू लागल्या होत्या. त्यावेळेस काटेवाडीत संत तुकाराम महाराजांची पालखी आली असता एक मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह तुकोबारायांना तीन रिंगण घतली होती. मेंढ्यांवरचा रोग संपू दे आणि त्या जिवंत राहू दे अशी प्रार्थना त्यावेळेस त्या मेंढपाळाने केली होती. पुढे हीच परंपरा कायम राखली गेली आणि आजही काटेवाडीत संत तुकोबांच्या पालखीचं आगमन होताच मेंढ्यांचे अनोखं रिंगण पाहायला मिळते.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

2026-10-07 10:29:35

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

2026-10-07 08:25:57

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

Pune District : चिंबळी-मोशी हद्दीतील के.टी. बंधारा कमालीचा दुरवस्थेत

2026-10-07 08:21:26

Pune District : चिंबळी-मोशी हद्दीतील के.टी. बंधारा कमालीचा दुरवस्थेत

Pune District : दुष्काळात सरकारने दिलासा द्यावा

2026-10-07 08:11:38

Pune District : दुष्काळात सरकारने दिलासा द्यावा