पुणे जिल्हा : बिबट्याच्या हल्ल्या एक शेळी शेळी ठार

दोन करडे पळवली : केळगावातील घटना
आळंदी – खेड तालुक्यातील केळगाव, हनुमानवाडीतील ठाकर वस्ती पासून जवळ असणार्या एका शेतात नागेश सतीश कोकरे (धनकर) यांचे कुटूंब शेळ्या, मेंढ्या (मेंढपाळाचा वाडा ) गेल्या काही दिवसांपासून वसलेले आहे. सोमवारी (दि. 22) पहाटे बिबट्याने त्याठिकाणी एका शेळीवर हल्ला केला असून शेळीची 2 पिल्ले (करडे) घेऊन तो पसार झाला आहे. त्याच्या या हल्ल्यात एक शेळी ठार झाली आहे.
बिबट्याने त्या शेळीस फरफटत जवळील ओढ्यात नेऊन तिचा फडशा पाडल्याचे आढळून आले आहे.ती शेळी गाभण असल्याचे यावेळी कोकरे कुटुंबाने यावेळी सांगितले.तसेच दोन करडे( शेळीचे पिल्ले) पळवली आहेत.
तेथील एक कुत्रे नाहीसे झाल्याची त्यांनी यावळी सांगितले. तसेच वनविभाग कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली आहे. तिथे बिबट्याचे पंजाचे ठस्से वनविभाग कर्मचार्यास आढळून आले आहेत.असे यावेळी कोकरे कुटुंबाने सांगितले.
टॅगिंग नसल्याने नुकसानभरपाई नाही?
महाराष्ट्र शासन, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग, शासन निर्णय (जीआर) आलेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. असे नमूद केले आहे.
दरम्यान, सर्व पशूंची ईअर टॅगिंग (कानावर बिल्ला असणे)या नवीन शासन निर्णय बाबत काहीही माहिती नसल्याचे यावेळी कोकरे कुटुंबाने सांगितले. एक गाभण शेळी बिबट्याने ठार केली असून दोन करडे ही नेली. यामुळे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.





