Pune District : खेड तालुक्यात 40 टक्के मुलांना लसीची मात्रा

राजगुरूनगर : राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुणे जिल्ह्यातील राबविण्यात येत आहे खेड तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांतून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीमेस यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली असून जवळपास 30 ते 40 टक्के मुलांना लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल माने यांनी दिली.
या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राजगुरूनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातुन मुलांचे लसीकरण करून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने पदभार घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली. खेड तालुक्यात या मोहिमेतंर्गत एकूण 1 लाख 7 हजार 937 बालकांसह मुलांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 10 मार्च पासुन खेड तालुक्यातील आतापर्यंत 6,470 बालकांना लसीची मात्रा देण्यात आली आहे.
जपानीज एन्सेफलायटीस हा आजार 15 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. आशिया खंडात अक्युट एन्सेफलायटीस सिन्ड्रोममुळे हा आजार होतो. या आजारात सुमारे 30 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात तसेच सदर रुग्णांमध्ये दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल अक्षमता आढळून येते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात येत आहे.तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी ,शिक्षक वृंद आणि आरोग्य कर्मचारी व आशा ,अंगणवाडी सेविका यांनी या मोहिमेत हिरीरिने सहभाग नोंदवला आहे..





