Pune District : करंजगावातील ३० जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

वीसगाव खोरे : करंजगाव (ता.भोर) येथील ३० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे व भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांच्या हस्ते झालेल्या करंजगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात पक्ष प्रवेश घेण्यात आले.
करंजगाव, परखंदेवाडी व पाटील आवाड येथील प्रकाश मळेकर, राघू मळेकर, नथुराम मळेकर, विश्वनाथ मळेकर, बाजीराव मळेकर, सत्त्यावान मळेकर, गणेश मळेकर, महेश मळेकर, सुनील मळेकर, प्रकाश रा. मळेकर, बाळासाहेब परखंदे, रामदास परखंदे, समीर परखंदे, शंकर परखंदे, संतोष परखंदे, नितीन परखंदे, अक्षय परखंदे, धोंडीबा मळेकर, अशोक सि. मळेकर, हरिभाऊ मळेकर, रामदास मळेकर, संतोष मळेकर, सुरज मळेकर, सागर ग. मळेकर, हनुमंत गायकवाड, राजु गायकवाड यांनी शिवतरे, घोरपडे यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी सुनील भेलके, प्रवीण जगदाळे, अविनाश गायकवाड, विष्णू मादगुडे, संदीप खाटपे, रघुनाथ पारठे, प्रदीप मांढरे, देवा म्हसूरकर, मारुती कंक,सागर मळेकर, बाळासाहेब खुटवड, मनोज खोपडे, केतन चव्हाण अंकुश कंक, अनिल गायकवाड यासह पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच,उपसरपंच, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच सागर मळेकर यांनी प्रास्ताविक केले. तर, प्रकाश मळेकर यांनी आभार मानले.





