पुणे जिल्हा : वैष्णवांना 24 तास आरोग्यसेवा

आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 6 दिवसांवर आला आहे. त्यापार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी आलेल्या वारकर्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी आळंदी प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे.
आरोग्य विभागाची तयारी अंतिम टप्पयात आली आहे. प्रस्थान काळात आलेल्या सर्व वारकर्यांना आळंदी ग्रामीण रुग्णालयामार्फत 24 तास आरोग्यसेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.
या आरोग्य सुविधा मिळणार –
* प्रस्थान काळात ग्रामीण रुग्णालय येथे 24 तास बाह्यरुग्ण सेवा.
* 5 आय सी यु बेड व्यवस्था.
* शहरात 9 ठिकाणी औषधोपचार बूथ.
* माऊली मंदिर येथे एक ऑक्सिजन बेड व एउॠ सुविधा.
* आळंदी शहर हद्दीतील सर्व खाजगी रुग्णालयास 10% खाटा राखीव.
* जम्बो व लहान ऑक्सिजन सिलेंडर, क्ष-किरण, ईसीजी मशीन कार्यान्वित.
* अतिरिक्त डॉक्टर, नर्स, कर्मचारी स्टाफ.
* ग्रामीण रुग्णालयात, पालखी तळावर स्त्री रोग वैद्यकीय अधिकारी.
* आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे (साथ रोग नियंत्रण कक्ष).
* 24 तास रुग्णवाहिका सेवा





