पुणे जिल्हा : वैष्णवांसाठी 24 तास वीजपुरवठा होणार

महावितरणची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण
आळंदी – वैष्णवांना शहरात वीजेच्या बाबतीत कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी आळंदी महावितरण विभागाकडून आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आली आहेत. प्रस्थान काळात 24 तास वीजपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे, अशी माहिती आळंदी महावितरणचे सहाय्यक अभियंता संदीप पाटील यांनी दिली.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून वारीच्या पार्श्वभूमीवर देखभाल दुरुस्तीसाठी दर शुक्रवारी आळंदी शहर, चर्होली, केळगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जात होता. तसेच इतर दिवशीही काही वेळा वीज खंडीत झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
मात्र आता सर्व देखभाल दुरूस्तीची कामे पूर्ण झाली असून एलटी लाइनवरील काम रविवार (दि. 23) पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडीत होण्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. आळंदी (ता. खेड) : महावितरणची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.





