Pune News : पुण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Pune News : पुण्यातील धनकवडी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे

Pune News : राहत्या इमारतीच्या पाचव्या माजल्यावरून खाली पडल्याने एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pune News)
रिद्धी रवी केडिया (वय १७, रा. निर्मल पार्क सोसायटी, चव्हाण नगर, धनकवडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धी बारावीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवणवगैरे झाल्यानंतर घरातील सर्व जण झोपी गेले. रिद्धी तिच्या आजीजवळ झोपायची. (Pune News)
पहाटे जेव्हा आजीला जाग आली तेव्हा त्यांना रिद्धी दिसली नाही. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. पहाटे सर्वजण जागे झाले. त्यांनी घरात शोधाशोध केली. मात्र, ती घरात आढळून आली नाही. घराचा दरवाजा पाहिला असता तो आतून कडीकोयंडा लावून बंद होता. त्यामुळे घराच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना एक स्टूल तेथे ठेवलेले दिसले. (Pune News)
कुटुंबीयांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली. पार्किंग व मोकळ्या जागेत शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी एका ठिकाणी रिद्धी निपचित पडलेली दिसली. तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. (Pune News)
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिला रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि वह्या, पुस्तके ताब्यात घेतली आहेत. (Pune News)
उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. तिच्यावर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत. (Pune News)





