Ketan Agrawal : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! सिया हॉटेलबाहेर पडताच चेतन दुसऱ्या मैत्रिणीसोबत रूममध्ये; सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ
Ketan Agrawal : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी नवी माहिती समोर येत आहे.

Ketan Agrawal : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत वडगाव मावळ न्यायालयाने आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. (Ketan Agrawal)
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी संशयितांनी एका कथित कॉन्ट्रॅक्ट किलरशी संपर्क साधल्याचा दावा आहे. संबंधित व्यक्तीने सुरुवातीला चर्चा केली, मात्र नंतर या कटातून माघार घेतल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा जबाब आणि संबंधित कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो तपासातील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. (Ketan Agrawal)
याशिवाय, पोलिसांनी जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांमध्ये संशयितांच्या वेब हिस्ट्रीतून काही व्हिडिओ पाहिल्याचेही आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, त्याचा तपासात उपयोग केला जात आहे. (Ketan Agrawal)
तसेच, तपासादरम्यान काही हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. या फुटेजच्या आधारे संशयितांच्या हालचालींची पडताळणी केली जात असून, त्यासंदर्भातील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. (Ketan Agrawal)
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चेतन आणि सिया हे दोघंच एकमेकांचे मित्र नव्हते, त्याच्याशिवाय सुद्धा आणखी त्यांचे काही मित्र होते. हे कुठे भेटायचे त्याचे किमान 4 ते 5 हॉटेल्सचे पत्ते पोलिसांना सापडले. (Ketan Agrawal)
तर एका ठिकाणच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन त्या हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत. काही काळानंतर, तास-दीड तासानंतर सिया बाहेर येते आणि नंतर एका दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन त्याच हॉटेलमध्ये, त्याच रूममध्ये जाताना दिसतोय, असंही सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आल्याची माहिती आहे. (Ketan Agrawal)
Ketan Agrawal Case : सिया-चेतन निर्दोष सुटणार? केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण; धक्कादायक माहिती आली समोर






