Pune : शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्याची मागणी

पुणे : महापालिकेकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद आणि लोकशाहीर अण्णाभाऊसाठी शैक्षणिक अर्थसाह्य योजने अंतर्गत दहावीसाठी १५ हजार रुपये तर १२ वीसाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
मागील १५ वर्षात या मदतीत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही या उलट महापालिकेचे उत्पन्न चार ते पाच पटीने वाढले आहे. त्यामुळे, प्रशासनाने यंदा पासून या शिष्यवृत्तीच्या रकेमत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन नुकतेच नवनियुक्त महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना देण्यात आले.
गेल्या काही वर्षात उच्च शिक्षणाच्या खर्चात वाढ झालेली आहे. तसेच, व्यावसायभिमुख अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कातही वाढ झालेली आहे, अशा स्थितीत शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे, या मागणीचे निवेदन देताना महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे सुरेश जैन, राष्ट्रवादीचे अजिंक्य पालकर, काॅग्रेसचे अभिजित महामुनी, प्रशांत गांधी यावेळी उपस्थित होते.





