Pune: डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्विनसह लोणावळ्याच्या सहा लोकल रद्द

पुणे – मध्य रेल्वेने पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगाव दरम्यान किमी १५४/०-१ येथे असलेल्या पूल क्रमांक १५४/१चे लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण ६ आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी ९ जून रोजी मेगा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्विन या एक्स्प्रेस आणि पुणे-लोणावळादरम्यान सहा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पाच मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे दि. ८ आणि ९ जूनला नियमन करण्यात येणार आहे.
पुणे-लोणावळा-पुणे विभागातील उपनगरी सेवा देणाऱ्या सहा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-लोणावळा (लोकल क्रमांक ०१५६४), लोणावळा-पुणे (लोकल क्रमांक ०१५६१), लोणावळा-शिवाजीनगर (लोकल क्रमांक ०१५६३),पुणे-लोणावळा (लोकल क्रमांक ०१५६६), शिवाजीनगर-तळेगाव (लोकल क्रमांक ०१५८८) आणि तळेगाव-पुणे (लोकल क्रमांक ०१५८९) या सहा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११००७), पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११००८), मुंबई-पुणे डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १२१२३) आणि पुणे-मुंबई डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १२१२४) या चार एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
…या मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
एमजीआर चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन १२१६४) ही गाडी ८ जून रोजी ३ तास ३० मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल. मुंबई-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन २२१५९) ही गाडी ९ जून रोजी ३० मिनिटांकरीता रेगुलेट करण्यात येईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस (ट्रेन १७२२२) ही गाडी ९ जून रोजी १५ मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.
तसेच तिरुवनंतपुरम मुंबई-एक्स्प्रेस (ट्रेन १६३३२) ही गाडी ८ जून रोजी १५ मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल. दौंड-इंदूर एक्स्प्रेस (ट्रेन २२९४३) ही गाडी ९ जून रोजी १५ मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.





