Deccan Queen: डेक्कन क्वीनचे संचलन प्लॅटफॉर्म एकवरून करा
Deccan Queen:

Deccan Queen: पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुन्हा पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून चालवावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
डेक्कन क्वीन ही पुणे- मुंबई प्रवासाची एक जीवनवाहिनी आणि ऐतिहासिक ओळख आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन यावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मोहोळ यांनी विभागीय रेल्वे समितीच्या बैठकीत सांगितले. याशिवाय डेक्कन क्वीनच्या प्रसिद्ध डायनिंग कारचा दर्जा सुधारण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
एकेकाळी या गाडीतील डायनिंग कारमधील खाद्यपदार्थांना मोठी प्रतिष्ठा होती. मात्र, गेल्या काही काळापासून अन्नाचा दर्जा, चव आणि एकूणच सेवेबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे डायनिंग कारचा दर्जा आणि सर्वोत्तम गुणवत्तेसाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, असे मोहोळ यांनी रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या.





