Pune : सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Updated On:

पुणे : बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए इंटिग्रेटेड आणि एमसीए इंटिग्रेटेड या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करून आता अर्ज करण्यास दि. २८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यापूर्वीही दोन वेळा मुदतवाढ दिली होती. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ज्यांनी अर्ज केले; पण शुल्क भरले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल, तसेच अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले नाहीत, त्यांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




