पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये व प्रात्यक्षिकेही मिळणार असल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डाॅ. आदित्य अभ्यंकर यांनी दिली.