Pune Accident : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरुण उद्योजकासह दोघांचा मृत्यू, कंटेनर चालक फरार!
Pune Accident : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ कंटेनर, कार, दुचाकी आणि बस या चार वाहनांमध्ये झालेला विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे.

Pune Accident : पुणे-आहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला. कंटेनर, कार, दुचाकी आणि बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वाडेगव्हाण येथील तरुण उद्योजक किशोर यादव यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा १८ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला असून, अपघाताची तीव्रता त्यातून स्पष्ट होत आहे. (Pune Accident)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-आहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ कंटेनर, कार, दुचाकी आणि बस यांच्यात अचानक धडक झाली. चार वाहनांचा एकाचवेळी अपघात झाल्याने महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Pune Accident)
या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी वाडेगव्हाण येथील उद्योजक किशोर यादव यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Accident)
पुणे आहिल्यानगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात#accident #Punenews pic.twitter.com/wrv4WkW0U0
— bharat jadhav (@bharatjadhav891) August 11, 2026
अपघातानंतर कंटेनर चालक फरार
अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला आणि यामध्ये कंटेनर चालकाची भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. (Pune Accident)
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फरार कंटेनर चालकाचा शोध घेण्यात येत आहे. (Pune Accident)
Pune Accident: शिवसेना ठाकरे गटातील नेत्याचा भीषण अपघात, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू





