Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीचा खुनाचा प्रयत्न ; आरोपी पतीला अटक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कौटुंबिक वादातून महिलेला दांडक्याने बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नगर रस्त्यावरील केसनंद भागात ही घटना घडली.सुशीला बिराप्पा खांडेकर (वय ४५, रा. लाडबा वस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती बिराप्पा शंकर खांडेकर (वय ५०) याला अटक करण्यात आली. याबाबत समर्थ बिराप्पा खांडेकर (वय २२) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खांडेकर दाम्पत्य मजुरी करते. आरोपी बिराप्पा हा पत्नी सुशीला यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा छळ करायचा. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्यात झालेल्या वादातून बिराप्पाने पत्नीला दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांचे डोके, नाकाला गंभीर दुखापत झाली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती बिराप्पाला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.


