Pune Crime | सरकारी कार्यालयातील कंम्प्युटर चोरी करणारे दोघे गजाआड
Updated On:

पुणे – स्वारगेट येथील पाटबंधारे कार्यालयातून संगणक लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले. जावेद अली पठाण (26 ) आणि सलमान मस्जीद शेख (33 , दोघे रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
स्वारगेट परिसरात पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. पठाण आणि शेख यांनी कार्यालयातून संगणक लांबविला होता. पोलीस कर्मचारी संदीप साळवे आणि सोमनाथ कांबळे यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोघांनी सापळा लावून पकडण्यात आले.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक अमोल रसाळ, शिंदे, पोलीस अंमलदार विजय कुंभार, विजय खोमणे, सचिन दळवी, वैभव शीतकाल. लखन ढावरे, ज्ञाना बढे, शंकर गायकवाड ऋषी तिटमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





