Pune Crime : पवारवस्तीत बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज चोरी
Updated On:

पुणे – पवारवस्ती लोहगाव वाघोली रोडवरील एका बंद सदनिकेचा कडी-कोयंडा कशाच्यातरी साह्याने उचकटून चोरट्यांनी 1 लाख 90 हजारांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, विमानतळ येथील एका 50 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 ते 9 सप्टेंबर रोजी फिर्यादी महिलेचे घर कुलूप लावून बंद होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिणे रोकड असा 1 लाख 90 हजारांचा किंमती ऐवज चोरी केला. फिर्यादी घरी आल्या असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.





