Pune Crime : नऱ्हेत दिवसाढवळ्या थरार! सिंहगड कॉलेजजवळ सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

प्रभात वृत्तसेवा
पुणे – एका सराईत गुन्हेगाराचा पाच जणांच्या टोळक्याने निर्घुन खून केला. ही घटना नऱ्हे येथील सिंहगड महाविद्यालया जवळील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी घडली. तौसिफ रफिक शेख (वय २२, रा.मक्का मशिद जवळ, कोंढवा ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तौसिफ वर अल्पवयीन असताना एक खूनाचा गुन्हा दाखल होता. सध्या ही त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. दुपारी त्याची एका टोळक्याबरोबर भांडणे झाली. हे टोकळे मारहाण करत असताना, त्यांच्या तावडीतून सुटत त्याने जवळील कृष्णकुंज इमारतीमध्ये पळ काढला.
मात्र त्याला पार्किंगमध्येच गाठत, धारदार शस्त्र दगड आणि कुंड्या डोक्यात टाकून त्याचा खून करण्यात आला.तो मयत होताच आरोपींनी पळ काढला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच तरुण पळून जाताना दिसत आहे. त्यांच्या मागावर पथके रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी दिली.





