पुणे – लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वढू खुर्द येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईतांना धारदार हत्यारांसह युनिट 6 ने अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, चाकू, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पुड या हत्यारांसह एक कार असा 3 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सचिन उर्फ राहुल राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (28, रा. तरवडे वस्ती, हडपसर), सारंग उर्फ सागर संजय टोळे (25), सनि महेशकुमार तनेजा (31), सिध्दू कडलसकर (रा. पंढरपूर), जयपालसिंग उर्फ मोन्यासिंग टाक (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिन, सारंग, सनि या तीन सराईताना अटक करण्यात आला आहे. युनिट 6 चे कर्मचार्यांना आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक करण्यात आली.